सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने व प्रमुख हस्ते टेंभुर्णी येथे
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे फादर बॉडी चे नूतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यात सुधीर खरटमल – सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष,पद्माकर (नाना) काळे – सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष,तौफिक इस्माईल शेख – सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष,भारत भिमराव जाधव – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, उमरखान नबिलाल बेरीया – शहर प्रवक्ता आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सौ.नलिनी सुधिरसिंह चंदेले – महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांची निवड विविध पदांवर झाली आहे.
नियुक्ती पत्र प्रदान वेळी जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष बळीराम काका साठे, पक्ष निरीक्षक शेखर माने,
ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश आण्णा कोठे, विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे चेयरमन अभिजित आबा पाटील आणि युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, प्रवक्ते महेश माने, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भारत जाधव यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यपदी कोणाची वर्णी लागणार?, याची उत्सुकता सोलापूरच्या राजकीय वर्तुळाला होती. माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते, त्यासाठी महेश कोठे यांचा गटही प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. मात्र, सुधीर खरटमल यांना शहराध्यक्षपदी संधी मीळाली आहे.तर पद्माकर काळे व तौफीक शेख यांना कार्याध्यक्षपदी संधी मीळाली आहे.आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानेही नेतृत्वात खांदेपालट केला असून निवडणूकांचे शिवधनुष्य जिंकण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकार्यांवर आहे.