25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरविकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे १८ ला अनावरण

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे १८ ला अनावरण

लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात सहकारी साखर कारखानदारी यशस्वी करुन या विभागाचे विशेष करुन ग्रामीण भागाचे मागासलेपण दूर करण्यात महत्वाचे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून यशस्वी वाटचाल करीत असलेल्या विलास साखर कारखान्यावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे सोबतच विलास भवन या कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीची शिलान्यास काँग्रेस पक्षाचे महासचिव महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या हस्ते दि. १८ फेब्रुवारी  रोजी सकाळी ११.१० वाजता होणार आहे.
लातूर जिल्ह्यात सहकार आणि साखर उदयोगाची उभारणी करणारे महान नेते, शेतक-यांचे कैवारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे  अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी क्षण असेल. हा कार्यक्रम आपल्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. लातूर तालुक्यासह जिल्ह्यातील अतिरीक्त ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. या कारखान्याने उभारणीपासून माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल केली आहे.
विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी  ता. जि. लातूर येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री विकासरत्न विलासराव  देशमुख यांचा पुर्णाकृती पुतळाचे अनावरण आणि ‘विलासभवन’ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास करण्यासाठी विकासरत्न विलासराव देशमुख स्मृति सोहळा रवीवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१० वाजता आयोजित करण्यात आला आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि विलास भवन प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास निमित्ताने आयोजित समारंभ सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विकासरत्न विलासराव देशमुख स्मृती सोहळा कार्यक्रमाच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख निमंत्रक असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महासचिव, (प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश) रमेश चेन्निथला यांच्या हस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रम होणार आहे.
 या मान्यवरांची असणार प्रमुख उपस्थिती 
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी महसुल मंत्री, विधानसभा, काँग्रेस पक्ष गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंतराव पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधान परिषद अंबादास दानवे, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, सुप्रसिध्द सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, कृष्णा सहकारी बॅक, चेअरमन डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले, माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, माजी वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, माजी सहकार व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आमदार व कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, माजी परीवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री बस्वराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आमदार व कार्याध्यक्षा कुणाल पाटील, मुंबादेवी विधानसभा आमदार अमिन आमिरअली पटेल, पाथरी विधानसभा आमदार सुरेश अंबादास वरपूडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकर,  सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, टवेंटीवन अ‍ॅग्री लि. संचालिका सौ.अदिती अमित देशमुख, जागृती शुगर लि. चेअरमन सौ. गौरवी अतुल भोसले-देशमुख यांची विशेष उपस्थित राहणार आहे. लातूर ग्रामिणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचीटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखाना चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, कृषी उत्पन बाजार समिती, उपसभापती सुनिल पडिले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, जागृती सुगर्स अ‍ॅण्ड अलाईड इन्डस्ट्रिज उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, ट्वेन्टीवन शुगर्स लि. उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास को. ऑपरेटीव्ह बॅक ली. व्हाईस  चेअरमन समद पटेल, रेणा सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन, अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना व्हाईस चेअरमन सचिन पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी, ता. जि.लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र व्यंकटराव काळे, कार्यकारी संचालक, यूनिट १ संजीव रघुनाथ देसाई, कार्यकारी संचालक, युनिट-२ आत्माराम रामचंद्र पवार, संचालक सर्वश्री अनंत बारबोले, गोविंद बोराडे, अमर मोरे, गुरुनाथ  गवळी, रामदास राऊत, रणजित पाटील, गोविंद  डूरे,  सुभाष  माने, नारायण पाटील, बाळासाहेब बिडवे, भैरवनाथ सवासे, अमृत जाधव, संजय पाटील खंडापूरकर, भारत आदमाने, ज्ञानोबा पडिले, सूर्यकांत  सुडे व समस्त विलास परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR