पुणे : प्रतिनिधी – उसाअभावी राज्यातील चार साखर कारखाने बंद झाले आहेत तर आजवर ७२३.३५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तर गतवर्षी यावेळी सहा कारखाने बंद झाले आणि साखर उत्पादन ८०३ लाख क्विंटल झाले होते.
उपलब्ध माहितीनुसार यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील सहकारी आणि खासगी मिळून २०७ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला असून त्यामध्ये सहकारी साखर कारखाने १०३ इतके आहेत. चालू गाळप हंगामात साखर उतारा ९.७३ टक्के मिळाला असून ऊस गाळप ७४३.२५ लाख मे टन इतके झाले आहे. राज्यातील जे चार साखर कारखाने आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी एकेक साखर कारखान्यांचा समावेश आहे.
हंगामाच्या सुरुवातीला पावसाच्या अनियमितपणाचा परिणाम उसाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती परिणामी साखर उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ९५ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उसाच्या उत्पादनात ८ ते १० टक्के वाढीचा अंदाज आहे.