सोलापूर: नझीर मुंशी तौसीफी समितीने आयोजित केलेल्या शुध्द लेखन व चित्रकला स्पर्धेत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धे मध्ये सहभाग नोंदविला.
नझीर मुंशी तौसिफी समितीच्या सदस्यांचे शाळेच्या वतीने उस्फूर्त स्वागत करण्यात आले. समितीचे अध्यक्ष नजीर मुंशी, डॉ. मोहम्मद शफी चौबदार, अय्युब नलामंदू , अ मन्नान शेख हे उपस्थित होते.
मुख्याध्यापक अशफाक अहमद सातखेड सर यांनी सर्व पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. म शफी चौबदार ,अ. मन्नान शेख , अय्युब नलामंदू यांनी विचार व्यक्त केले.व मेहबूब तिंबोळी सरांचे अभिनंदन केले. या स्पर्धेला यशस्वी करण्या करीता रिझवाना काझी, इरफान पठाण सर, अमरीन फराश, समीरा शिलेदार, रिझवाना मकानदार यांनी परिश्रम घेतले.