16.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी भाजपची ८ नावे श्रेष्ठींच्या विचाराधीन

राज्यसभेसाठी भाजपची ८ नावे श्रेष्ठींच्या विचाराधीन

मुंबई : राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल २९ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या ५६ जागांपैकी महाराष्ट्रातील सहा जागा आहेत.

महाराष्ट्रातून निवडून गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यात भाजपचे तीन खासदार होते. आता सहा पैकी तीन जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात. त्यामुळे या तीन जागांसाठी आठ नावे महाराष्ट्र भाजपने निश्चित केली आहेत. ही यादी दिल्लीस पाठवली आहे. तसेच चौथी जागा लढवावी का? यासंदर्भातही चाचपणी सुरु आहे.

भाजपची बैठक, ही नावे निश्चित
महाराष्ट्र भाजपची बैठक दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झाली. त्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. त्यात आठ नावे निश्चित करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. या आठपैकी तीन जणांची नावे निश्चित होणार आहेत. विनोद तावडे यांनी बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणले. यामुळे त्यांना राज्यसभेचे बक्षीस दिले जाणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजप श्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे.

चौथ्या जागेसाठी काय?
भाजप स्वबळावर दोन जागा निवडून आणू शकते. तिस-या जागेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आहे. तर चौथ्या जागेसाठी महाविकास आघाडीची मते फोडावी लागणार आहेत. सध्या भाजप तीन, अजित पवार यांची राष्ट्रवादी एक आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एक अशी निवडणूक होऊ शकते. तसेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु भाजपचे लक्ष्य चौथ्या जागेवर आहे. या जागेसाठी वरिष्ठांशी चर्चा महाराष्ट्रातील नेते करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR