24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरनिवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाची सोलापुरात निदर्शने

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाची सोलापुरात निदर्शने

सोलापूर- सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि नाव हे अजित पवार गटाचे असल्याचा निकाल दिल्याने बुधवारी काळ्या फिती लावून शरद पवार यांचा फोटो हातात घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शरद पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार – शरद पवार, मोदी शहांच्या हातातले बाहुले निवडणूक आयोग अश्या घोषणा देत निदर्शने करण्यात आले.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याचा निर्णय जो झाला, तो अत्यंत चुकीचा आणि घटनेच्या विरोधात आहे. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने आमदार कोणाकडे हे पाहिलेले आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या निर्णयावेळी आमदार, लोकप्रतिनिधी न पाहता संघटनेचेपदाधिकारी आणि संघटनेच्या बाजूने कोण आहेत हे पाहणे महत्वाचे आहे. अश्या पद्धतीचा निकाल, निरीक्षण सुप्रीम कोर्टाने केलेलं असताना त्याच्याकडे डोळेझाक करून केंद्राच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने दिलेला आहे.

२८ राज्यापैकी २५ राज्य शरद पवार यांच्याबरोबर असताना निवडणूक आयोगाला हे दिसले नाही. अनेक अ‍ॅफेडेवीट, पुरावे राज्यांनी दाखल केले. परंतु अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकार ईडीचा, सीबीआयचा आणि निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाला संपवण्याच काम करत आहे, असा आरोप प्रवक्ते अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी केला आहे. यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी शहर अध्यक्ष भारत जाधव, नूतन कार्याध्यक्ष पद्माकर काळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रवक्ते ऍड.यू. एन. बेरीया, माजी महापौर नलिनी चंदेले, प्रशांत बाबर, निशांत साळवे, ज्येष्ठ नेते महेश कोठे, अक्षय वाकसे, युवराज सरवदे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR