21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरउन्हाळ्यात जिल्ह्यात लागणार एक हजार २४१ टँकर

उन्हाळ्यात जिल्ह्यात लागणार एक हजार २४१ टँकर

सोलापूर :
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई निवारण आराखड्यात यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात एक हजार २४१ टँकर लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ४३ कोटी ८५ लाख ४२ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या गावांमध्ये आता किंवा यापूर्वी टँकर लागले आहेत, त्या गावांमध्ये प्राधान्याने जलजीवन ची कामे केली जात आहेत.

केंद्र सरकारच्या हर घर जल नळ अंतर्गत जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी मिळेल. सध्या दीडशे गावांमध्ये योजनेची कामे पूर्ण झाली आहेत. या महत्वकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरणार असून दुष्काळातील त्यांची पाण्यासाठीची वणवण देखील थांबणार आहे.

सोलापूर म्हंटले की दुष्काळ, पाणी व चारा टंचाई, पाण्यासाठी वणवण भटकंती असे समिकरणच झाले आहे. पण, विविध अडथळ्यांची शर्यत पार करून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमधून हर घर जल नळ अंतर्गत डिसेंबर २०२४पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये जलजीवन मधून पावणेसहा लाख कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे मोफत नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेतील कामांना गती प्राप्त झाली असून दर आठवड्याला योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी योजना व निविदांबद्दल तक्रारी होत्या. त्या सर्व तक्रारींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्यात आला आहे. आता बहुतेक गावांमध्ये योजनेची कामे सुरू असून पुढील दोन महिन्यांत बहुतांश गावांमध्ये योजना कार्यान्वित कशी होईल, याचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुष्काळीची तीव्रता कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, यादृष्टीने सध्या नियोजन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR