17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरमाता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक

सोलापूर:
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने सोलापूर शहरात भव्य आणि दिमाखदार अशी मिरवणूक काढण्यात आली. विविध देखाव्यांद्वारे माता रमाई आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविले. सुमारे ३० मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली. विविध संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दरम्यान, या जयंतीनिमित्ताने दिमह्याखदार अशी मिरवणूक काढण्यात आली. विविध संस्था व मंडळांच्या वतीने आकर्षक व प्रबोधनात्मक सजावट करून तथागत गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली.

पार्क स्टेडियम जवळील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीस जल्लोषात व उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. या मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. रखरखत्या उन्हातही कार्यकत्र्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बुद्ध दर्शन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रमाई युथ फाऊंडेशन, मायबाप युथ फाऊंडेशन, माता रमाई सामाजिक संस्था, रमाई युथ फाऊंडेशन, न्यू बुधवार पेठ युवा प्रतिष्ठान, महामानव प्रतिष्ठान,त्यागमूर्ती युवा प्रतिष्ठान, प्रबुद्ध ग्रुप,छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आर. बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था, १४ एप्रिल प्रतिष्ठान, गौतमी मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था यासह सुमारे ३० मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता.
मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसागर लोटला होता. भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक, सरस्वती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सम्राट चौक ते डॉ. आंबेडकर उद्यान येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
या देखाव्यांद्वारे मिरवणुकीत प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविण्यात आले.

माता रमाई युथ फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला लिहिलेली पत्रे तसेच विवाह सोहळा याचा देखावा साकारला होता. मायबाप युथ फाउंडेशने विवाह सोहळ्याचा व इतर प्रसंगाचा आकर्षक असा देखावा उभारला होता. रमाई सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकर हे अभ्यास करताना शेजारीच कंदील घेऊन प्रकाश देताना माता रम ह्याई या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. बुद्ध दर्शन बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रेरणादायी पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR