नवी दिल्ली : ‘मी ब-याच काळापासून माझ्या मुलीला भेटलेलो नाही, कारण पत्नी हसीना जहाँ मला भेटू देत नाही’ असे म्हणत मोहम्मद शमी भावूक झाला.दरम्यान, एका कार्यक्रमात मोहम्मद शमीला त्याची मुलगी आयराबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो भावूक झाला. ‘मी माझ्या मुलीला खूप मिस करतो. मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो. पण पत्नी हसीनाने अजूनपर्यंत मला तिला भेटू दिलेले नाही’असे शमी म्हणाला.
मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीना जहाँ मागच्या ६ वर्षांपासून वेगळे राहतायत. २०१८ साली हसीना जहाँने मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ती शमीपासून वेगळी झाली. शमी आणि हसीनामधला हा वाद पोलिस स्टेशन, कोर्टापर्यंत पोहोचला. त्यानंतर हसीना शमीपाासून वेगळी झाली. शमीची मुलगी सध्या हसीना जहाँसोबत राहत आहे.
हसीना जहाँ अजूनही मोहम्मद शमीला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. तिने अलीकडेच रोहित शर्माचा मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्याचा फोटो शेअर करताना मोहम्मद शमीवर खूप आरोप केले होते. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर शमीने मागे वळून पाहिले नाही.
हसीना जहाँसोबत वाद सुरू असताना मोहम्मद शमी व्यक्तिगत आयुष्यात खूपच अडचणीत होता. त्या दरम्यान त्याला टीम इंडियातही स्थान मिळाले नव्हते. पण मोहम्मद शमीने कमबॅक केले. २०१९ वर्ल्ड कपनंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. भारतात मागच्यावर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये मोहम्मद शमीने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या.