24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरविश्वस्तांच्या वादातून प्राणघातक हल्ला; १८ आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी

विश्वस्तांच्या वादातून प्राणघातक हल्ला; १८ आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी

सोलापूर – मशिदीच्या विश्वस्तांचा वाद आपापसात मिटविण्यासाठी शहर काझींनी मशिदीत बोलावलेल्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप होऊन त्यातून पाचजणांवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल १८ आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली. सोलापुरातील साखर पेठ- बुधवार बाजारात इकरार अली मशिदीत १ डिसेंबर २०१५ रोजी बैठकीत सशस्त्र हल्ल्याचा प्रकार घडला होता. या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी सुनावला. यात एकूण २१ आरोपी होते. त्यापैकी तीन आरोपी मयत झाल्यामुळे उर्वरीत १९ आरोपींवर खटला चालविण्यात आला.

महिबूब ऊर्फ दौला इस्माईल नालबंद, रियाज ऊर्फ गियासोद्दीन अहमदसाहेब रंगरेज, मतीन मुर्तुज नालबंद, अल्ताफ रफियोद्दीन वलमपल्ली, हारून रफियोद्दीन वलमपल्ली, दाऊद अब्बास नालबंद, जुबेर मेहमूद नालबंद, म. कासीम म. शरीफ नालबंद, मैनोद्दीन म. शरीफ नालबंद, सर्फराज म. शरीफ नालबंद, मेहमूद म. युसूफ नालबंद, गौस खाजादाऊद नालबंद, फारूख अ. रजाक मंगलगिरी, हसन ऊर्फ सैफ अ. रजाक मंगलगिरी, आरीफ जिलानी नालबंद आणि इलियास अ. रऊफ मुतवल्ली (सर्व रा. शनिवार पेठ, सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवार बाजारातील प्रसिध्द इकरारअली मशिदीच्या विश्वस्तांमध्ये वाद प्रलंबित होता. हा मिटविण्यासाठी मशिदीत शहर काझी अहमदअली सय्यद यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती.

आरोपी हे विश्वस्त नसताना मागील वर्षांपासून वर्गणी गोळा करतात, मशिदीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करून तेथे भाडेकरू ठेवतात, त्याचा हिशेब कधीही देत नाहीत, असा आरोप जैनोद्दीन शेख व इतरांनी केला असता संतापलेल्या आरोपींनी, तुम्ही हिशेब मागणारे कोण, असे विचारत जैनोद्दीन शेख व इतरांवर दगड-विटांसह सळईने हल्ला केला. ही मारहाण थांबविण्यासाठी धावून आलेल्या जैनोद्दीनची वृध्द आई मुमताज यांनाही मारहाण केली. याप्रकरणी जैनोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. राठोड यांनी तपास करून आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. अल्पना कुलकर्णी यांनी दहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादीसह इतरांची साक्ष, वैद्यकीय पुरावा ग्रा धरला गेला. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. एच. एच. बडेखान तर आरोपींतर्फे अ‍ॅड. धनंजय माने व अ‍ॅड. पी. एम. ढालायत यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR