मुंबई : मुंबईत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. याच दरम्यान मॉरिसच्या पत्नीचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.
मॉरिस खूपदा म्हणायचा, मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणार असा खळबळजनक खुलासा मॉरिसच्या पत्नीने केला आहे. मॉरिस खूपदा म्हणायचा, मी अभिषेकला सोडणार नाही, मी त्याला संपवणारच. पण मी मॉरिसच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही असे सांगितले. काही महिन्यांपूर्वी मॉरिसला बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. तो अनेक महिने तुरुंगात होता. आपल्या अटकेमागे अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजून होती. त्याचाच राग मॉरिसच्या मनात धगधगत होता. अभिषेक घोसाळकर यांच्याबद्दल खूप राग होता अशी माहिती आता समोर आली आहे.