21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षणही मोफत मिळणार!

महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षणही मोफत मिळणार!

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि.९) दिली. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एका कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना बोलत होते.

विद्यापीठात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात संदर्भात विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न प्रातिनिधीक स्वरुपात मांडावेत, असे आवाहन केले. जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी मागणी केली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR