25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरसोलापूरच्या विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडून निधी मंजूर

सोलापूरच्या विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडून निधी मंजूर

सोलापूर : सोलापूर महानगरपालिके करिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर विकासाचा संदर्भात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दुहेरी जल वाहिनी साठी 76 कोटी,उड्डाणपुलासाठी 60 कोटी,हुतात्मा स्मृती मंदिर नुतनीकरणासाठी 3.36 कोटी,दुबार तिबार पंपिंग साठी 3.56 कोटी शहरातील नाले विकसित करणे पहिला हप्ता 99.75 कोटी,अमृत योजना 2 मधून पाणी पुरवठा योजना ऊढफ मान्यता 882 कोटी निधी मंजूर केलेला आहे सोलापूरच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील आहे.

गेल्या वर्षभरापासून अजितदादा यांना सोलापूरच्या पिण्याच्या दुहेरी पाईप लाईन व विविध योजने करिता निधीची मागणी करत होतो त्याचप्रमाणे प्रशासनाकडून सुद्धा तशाच प्रकारचा प्रस्ताव सादर झालेला आहे.असे मनपा माजी गटनेते कीसन जाधव म्हणाले. अजीत दादा सोलापूर दौऱ्यावर असताना सदर योजनेबद्दल माहिती घेतली आणि त्याच बैठकीत सदरचा निधी मंजूर करण्यात आला .काही दिवसात 31 मार्च च्याआत आचारसंहिता लागण्या अगोदर सोलापूर महानगरपालिका मध्ये निधी प्राप्त होईल.

सोलापुरातील स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याचा संदर्भात अजीत दादांनी लक्ष घातलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील विविध विकास कामांना गती मिळवून देण्याचे काम सुरु झालेले आहे. अजीत दादांनी विकास निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे सोलापूरच्या वतीने आभार मानतो असे कीसन जाधव म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR