21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरगुरव समाजातर्फे पोलीस आयुक्त डॉ. माने यांचा सत्कार

गुरव समाजातर्फे पोलीस आयुक्त डॉ. माने यांचा सत्कार

सोलापूर- सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची बदली नुकतीच नाशिक शहरात झाली. सोलापुरात त्यांनी केलेल्या चांगल्या कामानिमित्त त्यांचा राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्किन सिटी येथे डॉ. माने व त्यांच्या सौभाग्यवती यांचा डॉ. नितीन ढेपे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मल्लीकार्जुन गुरव, उपाध्यक्ष शशिकांत जिड्डीमणी, संघटक नितीन ढेपे, जिल्हा अध्यक्ष निंगराज विंचुरे, प्रदेश कार्यकारणी चंद्रकांत गुरव, काशिनाथ मेलगिरी आदी उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी आभार मानले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR