28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमुख्य बातम्यानितीश कुमारांचे बहुमत सिद्ध

नितीश कुमारांचे बहुमत सिद्ध

बिहारमध्ये जेडीयू-एनडीए सरकारवर शिक्कामोर्तब

पाटणा : बहुमत चाचणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल (युनायटेड) आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ आमदारांची आवश्यकता होती. नितीश कुमार यांना १२९ आमदारांचे समर्थन मिळाले. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजपचे तीन आमदार भागीरथी देवी, रश्मी वर्मा आणि मिश्री लाल हे विधानसभेत आले नव्हते. त्यामुळे वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. विधानसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी प्रस्ताव समोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर अध्यक्षांना पदावरुन हटवण्यात आले. सर्व आमदार एकजूट असल्याचा दावा नितीश कुमार यांनी यापूर्वी केला होता. आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले होते.

लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांना बिहारच्या विधानसभा अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांना हटवण्याच्या बाजूने १२५ मते पडली तर विरोधात ११२ मते पडली. त्यानंतर बहुमत चाचणीला सुरुवात झाली . दरम्यान, आरजेडीचे तीन आमदार पलटले आहेत. ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए गटाच्या जागी जाऊन बसले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR