29.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमनोरंजन‘भुलभुलैय्या३’ मध्ये झळकणार विद्या बालन

‘भुलभुलैय्या३’ मध्ये झळकणार विद्या बालन

मुंबई : २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालनचा ‘भुल भुलैय्या’ या सिनेमाचा आता तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन हिची धमाकेदार एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाची कालच घोषणा झाली. कार्तिकने ‘भुलभुलैय्या३’ मध्ये मूळ मंजुलिका म्हणजेच विद्या बालनची एंट्री होणार असल्याची माहिती दिली आहे. विद्या बालन २००७ मध्ये आलेल्या ‘भुलभुलैय्या ’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मंजुलिकाच्या भूमिकेत दिसली होती. पण, त्याच्या सिक्वेलमध्ये अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यनने घेतली होती. तर तब्बूने मंजुलिका हे पात्र साकारत विद्या बालनची जागा घेतली.
विद्या बालनला आता पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.

काल कार्तिकने या चित्रपटात विद्या बालन परतणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली, त्यानंतर अक्षय कुमारही यात दिसणार का याविषयी दिग्दर्शकांनी मोठा खुलासा केला आहे, सोबतच विद्यासोबत या सिनेमात अजून एका अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

विद्यासोबतच या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील झळकणार असल्याचे बोलले जात आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार विद्या बालन आणि कार्तिक आर्यनसह या चित्रपटात माधुरी दीक्षित देखील दिसणार आहे. शिवाय तिच्या भूमिकेविषयी देखील माहिती समोर आली आहे. माधुरी या चित्रपटात एका भूताची भूमिका करत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR