25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस चौकीसमोर तरुणाने घेतले पेटवून

पोलिस चौकीसमोर तरुणाने घेतले पेटवून

वाघोली : शिवीगाळ व मारहाण झाल्यानंतर तरुणाच्या तक्रारी नंतर लोणीकंद पोलीसांनी मारहाण करणा-यां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांना अटक करावी अशी त्याची मागणी होती. ती न पूर्ण केल्याने २८ वर्षीय तरुणाने मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलिस चौकी समोर स्वताहाला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे.

रोहिदास अशोक जाधव ( वय ३३, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास हा डोमखेल रोडवरील सिद्धी पार्क सोसायटी मध्ये राहत होता. या सोसायटीमध्ये पाणी व अन्य कारणावरून त्याचा सोसायटी मधील अन्य दोघांशी व बांधकाम व्यावसायिकाशी वाद होता.

त्यांच्या विरोधात त्याने २२ जानेवारी २०२३ व १० फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीसात तक्रार दिली होती. ते दोघे जण व बांधकाम व्यावसायिक हे आपल्याला सतत शिवीगाळ व मारहाण करीत असल्याची त्याची तक्रार होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र मला मारहाण करणा-यांना पोलिसांनी अटक करावी अशी त्याची मागणी होती. यासाठी तो सोमवारी पोलीस ठाण्यात व वाघोली चौकीत गेला होता. मंगळवारी सकाळी पुन्हा तो सकाळी ११ च्या सुमारास वाघोली पोलीस चौकीत आला. यावेळी तीन पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते. त्याने भर चौकीत स्वत:ला पेटवून घेतले. नंतर तो त्याच स्थितीत मोकळ्या जागेत पळाला. नागरिक व तिथे असलेल्या पोलीसांनी त्याला पाणी टाकुन विझविले.

तो पर्यंत तो संपूर्ण भाजला होता. त्याला त्वरित तेथील आयमॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यावेळी पोलीस चौकी परिसरात गोंधळ व आरडाओरड झाला. रुग्णालयाने प्राथमिक उपचार करून गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात पाठविले. घटनेनंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजय मगर व सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR