नागपूर : लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशभरात चांगलेच वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा देखील करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील लोकसभा निवडणुकीसाठीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
नागपूरमध्ये काही अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना यश मिळावे यासाठी प्रसिद्ध ताजुद्दीन बाबा दर्ग्यात चादर चढवली आणि प्रार्थना केली.
मुस्लिम आणि शीख समाजच्या बांधवांनी ताजुद्दीनबाबा दर्गा परिसरात हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या मजारीवर मोदींच्या विजयासाठी चादर चढवण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश मिळावे, यासाठी नागपुरात ताजुद्दीनबाबा दर्ग्यात विशेष प्रार्थना करण्यात आली.