31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरचार दिवस उपोषण करुन बघा

चार दिवस उपोषण करुन बघा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी वारंवार उपोषण करणा-या मनोज जरांगेंवर नारायण राणे यांनी नुकतीच टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज जरांगेंनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणेंचे वय झाले म्हणून नाहीतर त्यांनाही सोडणार नाही, यांसह अनेक शाब्दिक फटकारे जरांगेंनी मारले आहेत.

पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले मला यावेळीही नारायण राणेंना सुटी द्यायची आहे. निलेश राणेंना माझे आवाहन तुम्ही त्यांना थांबवा. कारण मला सुद्धाकाही मर्यादा आहेत. मी कचाट्यात आला की धुवून काढीन. नारायण राणे या शब्दाबद्दल माझ्यातोंडून ब्र शब्द आहे का? नरेंद्र मोदींना देखील स्वाभिमान आहे ओबीसींचा, दोन वेळेला त्यांनी भाषणात तसे म्हटले आहे. मी मराठ्यांकडून बोललो तर तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे तुम्ही त्यांची री ओढणारे कोण आहात? तुम्हाला आमच्या बाजूने बोलण्याचा स्वाभिमान असायला पाहिजे होता. तुम्ही एकटेच तेनसिंगराव लागून गेले काय? नारायण राणेंचे वय आहे त्यामुळे मी त्यांचा आदर करतो. मोठ्या किंमतीचा माणूस आहे, माझ्या भावना समजत असेल तर समजून घ्या नाहीतर मी पुरता पाणउतारा करत असतो. ही शेवटी संधी आहे, अशा शब्दांत जरांगेंनी राणेंना निर्वाणीचा इशाराही दिला.

नारायण राणे उद्याच काय आता एका तासाने जरी बोलले तरी मी त्यांना सोडणार नाही. त्यांना खेटायची तयारीही आहे आपली. मराठ्यांची ताकद काय आहे? असे जर ते मला चॅलेंज देत असतील ना. तर मी खूप नमुना आहे. कारण मी पण मराठा आहे. आम्ही तिस-याला बोलले तर तुम्ही मध्येच बोलायचे हे उद्योग तुम्हाला कोणी सांगितलेत? तुम्ही काय ठेका घेतलात का मध्येच पडायला? तुम्ही गुंड आहात तर मग सामान्य मराठा काय कच्चे समजलात काय तुम्ही? अंथरुणात पडून नाटक करतो असे मला म्हणता पण उपोषण जरा चारच दिवस करुन पाहा कुठून कुठून हवा निघते ना? हे कळेल, अशा कठोर शब्दांत जरांगेंनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR