18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्याधनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच!

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच!

 मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

मुंबई : धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे या निकालाकडे लक्ष लागले होते, दरम्यान याचिका फेटाळल्याने हा धनगर समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अनेक दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ती पार पडल्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला आहे. जस्टीस पटेल आणि जस्टीस कमल खटा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे की, अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसद मंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिले जाऊ शकते, असे म्हणत एसटीमधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता धनगर समाज, याचिकाकर्ते आणि नेतेमंडळी पुढील कायदेशीर भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR