28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअकाऊंट ‘युपी’त, कॉल सेंटर दिल्लीत आणि ‘विड्रॉल’ गोव्यात!

अकाऊंट ‘युपी’त, कॉल सेंटर दिल्लीत आणि ‘विड्रॉल’ गोव्यात!

आमिष दाखवत लाखांत फसवणूक; २ सायबर गुन्हेगारांना अटक

जळगाव : विम्यावर अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखांत फसवणूक केल्याच्या अनेक घटना जळगाव जिल्ह्यासह राज्यात घडत असून जळगाव सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे संपर्काचे कॉलसेंटर दिल्लीत, भामट्यांचे अकाऊंट ऑपरेटिंग उत्तर प्रदेशातून आणि लुटलेली रक्कम गोव्यात विड्रॉल करणा-या दोघांना जळगाव सायबर पोलिस पथकाने गोव्यातून अटक केली.

अवधेशकुमार रामकिशोर (वय-२४) व रामप्रसाद निशाद लल्लू निशाद (वय-२५) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून या स्वरूपाचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अशी आहे ऑपरेंडी
सायबर पोलिस ठाण्यात डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकाला तांत्रिक विश्लेषणातून असे आढळून आले की, जिल्ह्यासह राज्यातील खास करून मराठी व्यक्तींना संपर्क करून त्यांना विमा पॉलिसीतून अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे आमिष देत किंवा शेअर बाजारांत गुंतवणुकीचे आमिष देत गंडवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून मुळ दिल्लीच्या कॉल सेंटरमधून संपर्क करून उत्तरप्रदेशातील ‘क्ष’ खात्यामध्ये पैसे मागवले जातात.

तेथून गोवा येथील खात्यात वर्ग करून त्या खात्यातून पैसा विड्रॉल करत तिस-याच वेगळ्या खात्यात भरणा केला जात असल्याचे आढळून आले आहे.

३० हजार रुपये महिना
अटकेतील दोघांना फक्त गोव्यातून ठराविक बँकांमधून संबंधित खात्यात जमा झालेली रक्कम ‘विड्रॉल’ करून ती, वेगळ्या खात्यात भरणा करण्याचे काम दिले गेले. या साठी प्रत्येकी ३० हजार रुपये महिना आम्हाला त्यासाठी दिला जात असल्याचे अटकेतील दोघांनी माहिती देताना सांगितले. या मागे मोठ्ठे रॅकेट असून दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून हा फसवणुकीचा धंदा चालवला जात असल्याचे सांगण्यात आले.

गोव्यातून काढले पैसे
सायबर पोलिसांत दाखल गुन्ह्यात तशाच पद्धतीने मडगाव, गोवा येथील एटीएममधून सदर खात्यावरून रक्कम काढल्याचे जळगाव सायबर पोलिसांना समजताच त्यांनी संबंधित बँकेकडून तेथील सीसीटीव्ही फुटेज मागवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR