27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीमालमत्ता अटकावणीस विरोध करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

मालमत्ता अटकावणीस विरोध करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

परभणी : शहर महानगरपालिके मार्फत मालमत्ता कराचे मागणी बिल देऊन वारंवार पाठपुरावा करून जप्ती/अटकावणीची नोटीस बजावूनही मालमत्ता कर न भरणा-या थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली पथके नेमण्यात आलेली आहेत. सदर पथकांमार्फत प्रभाग समिती क्षेत्रातील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी पाठपुरावा करणे, कर न भरणा-या मालमत्ता धारकांची जंगम मालमत्ता जप्त करणे, स्थावर मालमत्ता अटकांवणीची कार्यवाही करण्यात येत आहे. या मोहीम दरम्यान मालमत्ता अटकावणीस विरोध करणा-या दोघांवर नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महानगर पालिकेच्या विशेष वसुली पथकामार्फत दि.१५ रोजी एमआयडीसी परीसरातील उद्योजक मालमत्ता थकबाकीदारांकडून मालमत्ता वसुलीची मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये थकबाकीदारांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे मालमत्ता अटकावणी करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. अतिरिक्त आयुक्त यांनी वसुली पथकासोबत रात्री उशीरा अटकावणी केलेल्या मालमत्तेस भेट देऊन मालमत्तेत कोणताही कामगार आतमध्ये नसल्याची व विद्युत उपकरण चालू नसल्याबाबतची खात्री केली. अटकावणी केलेल्या मालमत्ताची नावे मथुरा इंस्ट्रक्शन उदय कत्रुवार थकबाकी रक्कम ५९,८६,३२८, साईबाबा ऑईलमील एकनाथ वटटमवार थकबाकी रक्कम २२,८०,८६१ रूपये, मे. श्रीकृष्ण अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज – लक्ष्मीकांत व्यवहारे थकबाकी रक्कम २३,७४,८३० रूपये, मे. कृष्णा इंडस्ट्रीज – दर्गड संतोष श्रीराम थकबाकी रक्कम रु. ८,२६,८१७ रूपये तर मे. एस. आय. स्टील – सय्यद फरहान स. इरफान थकबाकी रक्कम ५,३०,९७८ रूपये आहे.

सदर मोहीमे दरम्यान वसुली पथकास मालमत्ता अटकावणी करण्यास विरोध, दमदाटी व शिविगाळ करणा-या मालमत्ताधारक / नागरीकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी महापालिकेच्यावतीने मोंढा पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल व्यक्तींची नावे मे. श्री गणेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज ओमप्रकाश जगन्नाथ डागा थकबाकी रक्कम ४७,६५,४५८ रूपये तर मे. मोती स्टार्च अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज दिपक गुरूदास तलरेजा थकबाकी रक्कम ४२,८६,१६० रूपये अशी आहेत. सदर मोहीम यापुढेही चालू राहणार असल्यामुळे शहरातील नागरीकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टीचा तात्काळ भरणा करून कटू कार्यवाही टाळावी व महानगर पालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR