सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर हल्ला करणार्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी डीजीटल मीडीया पत्रकारांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे येथे निर्भय बनो यात्रा कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काही माथेफिरुनी जिवघेणा हल्ला करून वाहनाची तोडफोड केली यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे कसेबसे वाचले.
लोकशाही राज्यात संविधानाची कास पकडून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा तसेच वास्तविकेचे भान ठेवून निर्भीडपणे सत्य प्रकाशित करणारा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार आज सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनता आपले जीवन भयभीतपणे जगणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे, राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले व खोट्या केसेस दाखल करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे, . ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राण घातक हल्ला करणार्यांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पत्रकार अब्दुल पठाण, खालीद उर्फ बबलू चंदरकी, युनूस अतार, संगीता बिराजदार, शब्बीर मणियार, अकबर शेख, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक लाल कोट, नितीन कांबळे, निसार उस्ताद आदी उपस्थित होते