18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeउद्योगपेटीएमची सेवा सुरूच राहणार

पेटीएमची सेवा सुरूच राहणार

क्यूआर कोड, साऊंड बॉक्स आणि कार्ड मशिनचा वापर कायम करता येणार आरबीआयचेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केल्यानंतर पेटीएमवरून पैसे ट्रान्सफर करता येणार का किंवा त्याची सेवा सुरू राहणार का असे एक ना अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यावर आता आरबीआयने त्यांच्या प्रश्नोत्तरांमधून स्पष्टीकरण दिले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की कंपनीचा क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही समस्येशिवाय काम करत राहतील.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या या सेवांबाबत बाजारात अफवा पसरल्या होत्या. पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने व्यापा-यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांचे नोडल खाते अ‍ॅक्सिस बँकेला दिले आहे. यासाठी एस्क्रो खाते उघडले जाईल. डल्ली ९७ कम्युनिकेशन्सची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस (पीपीएसएल) आधीच अ‍ॅक्सिस बँकेसोबत काम करत होती. आरबीआय बँकेने पेटीएमला दिलासा देत ठेवी घेण्यावरील बंदीची अंतिम तारीख २९ फेब्रुवारीवरून वाढवून १५ मार्च केली आहे. याशिवाय ग्राहकांना येणा-या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ऋअद म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं देखील जारी करण्यात आले आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की पेटीएमची व्यापारी पेमेंट सेवा १५ मार्चनंतरही सुरू राहणार आहे.

पेटीएमचेही स्पष्टीकरण
फिनटेक कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइंिलगमध्ये म्हटले आहे की व्यापा-यांचे दफ कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहतील. व्यापारी सेटलमेंटमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेशी करार करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR