नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा येणार आमने-सामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमठी मतदारसंघातून दोघे पुन्हा एकदा लढणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमेठीचे माजी खासदार राहुल गांधी ब-याच काळानंतर अमेठी दौ-यावर येत आहेत. तर स्मृती इराणी सोमवापासून चार दिवसांच्या अमेठी दौ-यावर आहेत.
भाजप खासदार स्मती इराणी २४ गावांत जनसंवाद यात्रा कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. तर राहुल गांधी अमेठी आणि गौरीगंज येथे पदयात्रा काढणार आहेत. याशिवाय ते बाबूगंज येथे सभेला संबोधित करतील. दरम्यान सध्या दोन्ही नेते अमेठीत दाखल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्मृती इराणी अमेठी मतदारसंघात दौरा करणार आहेत. यावेळी त्या लोकांच्या समस्या समजून घेतील. यावेळी मतदारसंघातील अनेक गावांना त्या भेटी देणार आहेत. याशिवाय सामन्य लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असेल, असे भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात आले आहे.