21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र६५ वर्षीय वृद्धाचा चिमुरडीवर अत्याचार

६५ वर्षीय वृद्धाचा चिमुरडीवर अत्याचार

जळगाव : रावेर तालुक्यातील गोलवाडे येथील पाच वर्षीय मुलीवर तेथीलच एका वृद्ध व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथे पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आजीसोबत राहत होती. गावातील राहणा-या एका संशयित आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसांत संशयित आरोपी वामन बळिराम बेलदार (६५) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस कर्मचारी हरिदास बोचरे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR