24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूररिटेवाडी उपसा सिंचनसाठी बैठक घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

रिटेवाडी उपसा सिंचनसाठी बैठक घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

करमाळा : रिटेवाडी उपसा सिंचन सुरू न झाल्यास चाळीस गावातील 70 हजार मतदार मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे ही बाब जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनाला आणून दीली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ यासंदर्भात कारवाई करावी अशा सूचना जनसंपर्क अधिकारी आशिष कुलकर्णी यांना दिल्या.

धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांनी उजनी धरणात वरील धरणातून दहा टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात दिलेली निवेदन देऊन सोलापूर जिल्ह्यात पडणारा भयंकर दुष्काळ लक्षात घेऊन वरील धरणातून दहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली.महाराष्ट्र विधानसभेचे शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांनी वस्तुस्थिती मांडली. शिवसेनेचे करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर उपस्थित होते..पाच मिनिट मुख्यमंत्र्यांनी हा विषय समजून घेतला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवण करून देताना महेश चिवटे म्हणाले की करमाळ्यातील जाहीर सभेत ही योजना मार्गी लावण्याची आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करमाळ्यात आलेल्या मुंबईच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सुद्धा तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधीक्षक नितीन दळवी यांनी याबाबत बैठक लावण्याच्या सूचना जलसंपदा खात्याला दिल्या होत्या.गेल्या चार महिन्यापासून मुख्यमंत्र्यांना वेळापत्रका बैठकीसाठी वेळ निश्चित झाली नाही.केवळ शंभर कोटी रुपयासाठी ही योजना रखडली असून जलसंपदा विभागाने ही योजना होऊ शकते असा सकारात्मक अहवाल शासनाला दिला असून त्याची प्रत ही महेश चिवटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.यावेळी विधानसभेचे प्रथम आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ही बैठक घेऊ असे आश्वासन दिले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR