28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरग्रामपंचायत कार्यालयासमोरील अन्त्यविधी टळला

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अन्त्यविधी टळला

निलंगा : प्रतिनिधी
गाव तसं चांगलं परंतु गावातील एखादा माणूस मरण पावला की, त्याचा अंत्यविधी कुठे करायचा हा निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन या गावातील नागरिकांना पडलेला कायमचा प्रश्न…? आहे. लोकप्रतिनिधी येतात आश्वासन देतात प्रशासन येते तेही आश्वासन देते परंतु गावातील नागरिकांना अंत्यविधीसाठी कायमस्वरूपी जागा अद्यापही उपलब्ध करून दिलेली नाही. स्मशानभूमी नसल्याने येथील  नागरिकांनी ग्रामपंचायसमोर अन्त्ययात्रेची तयारी सुरू असतानाच निलंगा प्रशासनाने दाखल घेतल्याने ती स्थिती टळली.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा (मेन) येथील कुमार बाबुराव कांबळे  वय ४६ यांचे दि. १९ फेबु्रवारी रोजी अल्पशा आजाराने दुपारी निधन झाले होते. अंत्यविधी करण्यासाठी पाहुण्यांना वेळ देण्यात आली परंतु अंत्यविधीसाठी जागेची अडचण व स्मशानभूमीत नसल्याने येथील दलित समाजाने येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरण रचत अंत्यविधी करण्याचे ठरविले. परंतु निलंगा प्रशासनाने मध्यस्थी करून महिनाभरात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून स्मशानभूमीची मंजुरी देऊ असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायतसमोर करण्यात येणारी अंत्यविधी इतर ठिकाणी करण्यात आले.  सायंकाळी पाच वाजता होणारा अंत्यविधी रात्री आठच्या सुमारास करण्यात आला.  तब्बल तीन तास अंत्यविधीला उशीर झाला यामुळे बाहेर गावाऊन आलेल्या पाहुण्यांना गैरसोयीला सामोरे जावे  लागले. कुमार कांबळे यांच्या पश्चात वडील, पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR