31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात बारावीच्या परीक्षेस शांततेत प्रारंभ

जळकोट तालुक्यात बारावीच्या परीक्षेस शांततेत प्रारंभ

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रावर २१ फेब्रुवारीपासून  बारावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला. तालुक्यामध्ये श्री गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ज्ञानविकास विद्यालय तसेच शिवाजीनगर तांडा येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळा या तीन परीक्षा केंद्रावर परिक्षा सुरू आहेत. या परीक्षा केंद्रावर ११२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जळकोट तालुक्यातील परीक्षा केंद्रांना तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी भेटी दिल्या .
तालुक्यामध्ये भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये गटशिक्षणाधिकारी जयंिसह जगताप, नायब तहसीलदार राजाराम खरात, संतोष गुट्टे, मंडळ अधिकारी कमलाकर पन्हाळे, राजेंद्र कांबळे, कर्मचारी अरंिवद घाटे, तलाठी शेख, धुपे तर पंचायत समितीचे सताळे जी. जी. तिगोटे, नारायण, यंगाले ए. एस, सुवर्णकार व्ही. एस, त्रीपती. जी . ए., सिंधीकुमठे व्ही. एस., अदावळे व्ही. एस., सोनटक्के एस. एच., तिडके एस. बी.  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेसाठी जळकोट येथील श्री गुरुदत्त विद्यालय, पाटोदा बुद्रक येथील ज्ञानविकास विद्यालय पाटोदा बु , शिवाजीनगर तांडा येथील उच्च माध्यमिक आश्रमशाळा असे तीन परीक्षा केंद्र आहेत, परिरक्षक म्हणून  म्हणून जयंिसह जगताप, हे काम पाहत आहेत तर त्यांना  सहाय  विवेक पेद्यवाड, माधव हंगरने, नागेश गोविदवाड, महेश वासरे, माधव बळते, लिपिक दत्तात्रय काळे, हे करणार आहे. संबंधित केंद्रावर उत्तरपत्रिका तसेच प्रश्नपत्रिका पुरवण्यासाठी  रनर म्हणून माधव बिरादार, एकनाथ बेड़े, गोंिवद चामे, व्यंकट आंदे, गणेश पाटील हे कामकाज पाहणार आहेत, केंद्र संचालक म्हणून प्रा. गोंिवदराव धुळशेट्टे, ज्ञानविकास विद्यालयात एस. के. मोरे, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत ए. बी. हंबीरे काम पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR