सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले अध्यासन केंद्र स्थापन करण्याची मागणी माळी महासंघाने निवेदनाद्वारे केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर, मौलाना आझाद हि अध्यासन केंद्रे यापूर्वीच कार्यरत आहेत. तसेच आता विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे आणि छत्रपती संभाजी महाराज ही तीन अध्यासन केंद्र स्थापन करण्याचे ठरवलेले आहे असे समजते.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीमध्ये पुरवणी मागणी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे अध्यासन केंद्र स्थापन करावे अशी मागणी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पोपट माळी प्रदेश अध्यक्ष, किसान आघाडी शंकरराव वाघमारे सोलापूर,जिल्हाध्यक्ष ,सुधाकर जांभळे यांनी केली आहे.