मुंबई : ५७ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आज (२२ फेब्रुवारी) संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली.
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार- २०२२ हा पुरस्कार विधू विनोद चोप्रा आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार-२०२१ हा पुरस्कार सोनू निगम यांना प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार-२०२२ हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार विजेते : सर्वोत्कृष्ट कथा-स्व. स्व.बा. बोरकर (पांघरुण), सर्वोत्कृष्ट पटकथा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज), सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णिक (आनंदी गोपाळ), सर्वोत्कृष्ट गीत- संजय कृष्णाजी पाटील (हिरकणी), सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत- प्रफुल्ल-स्वप्निल, सर्वोत्कृष्ट संगीत- अमित राज, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक -सोनू निगम, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका- मधुरा कुंभार (हिरकणी), सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- सुभाष नकाशे (हिरकणी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नंदिता पाटकर (बाबा), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रोहित फाळके, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- पार्थ भालेराव, सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री- अंकिता लांडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर), सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोबरियाल (बाबा), प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती- झॉलिवूड, प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक -अच्युत नारायण (वेगळी वाट), सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक- समीर विध्वंस (आनंदी गोपाळ), दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक- १ – अजित वाडीकर- चित्रपट- वाय, व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार- गजेंद्र अहिरे.