22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमनोरंजनअनोळखी व्यक्तीने भरले सोनू सूदच्या जेवणाचे बील

अनोळखी व्यक्तीने भरले सोनू सूदच्या जेवणाचे बील

मुंबई : कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला बॉलिवूडचा खलनायक म्हणजे सोनू सूद रुपेरी पडद्यावर सोनू सूदने अनेक खलनायिकी भूमिका साकारल्या. मात्र, ख-या आयुष्यात त्याने गरजूंसाठी हिरोसारखे काम केले. त्यामुळेच आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत त्याच्या नावाची चर्चा होत असते. परंतु, सध्या त्याच्या बाबतीत असा प्रसंग घडला आहे. ज्याची चर्चा नेटक-यांमध्ये रंगली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या सोनू सूदचे बील चक्क एका अनोळखी व्यक्तीने भरले. इतकेच नाही तर त्याने सोबत जी चिठ्ठी लिहिली ती भारावून टाकणारी होती.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सोनू सूदने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक त्याच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी दिसून येत आहे. ही चिठ्ठी एका अनोळखी व्यक्तीने लिहिली असून त्याने सोनू सूदच्या जेवणाचे बील सुद्धा भरले. विशेष म्हणजे या व्यक्तीने असे का केले असेल? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, त्यामागे एक खास कारण असल्याचे समोर आले आहे. मला माहित नाही हे कोणी केले. पण एका व्यक्तीने आमच्या जेवणाचे सगळे बील भरले आणि, सोबत एक चिठ्ठी सुद्धा ठेवली. त्यांचे हे वागणे अगदीच मनस्पर्शून गेले आहे, असे कॅप्शन देत सोनू सूदने ही पोस्ट शेअर केली आहे. सोबतच या पोस्टमध्ये त्याने अनोळखी व्यक्तीने त्याच्या नावाने ठेवलेल्या चिठ्ठीचा फोटोही शेअर केला आहे. या चिठ्ठीमध्ये, तुम्ही देशासाठी जी काही चांगली काम केली, त्या सगळ्यासाठी मनापासून धन्यवाद असे लिहिले आहे. दरम्यान, सोनू सूदने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. अनेक जणांनी सोनू सूदचे कौतुक केले. तू देशातील नागरिकांसाठी जे केले आहे त्याचे उपकार कोणी परत फेडू शकणार नाही असेही अनेकांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR