21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यादाऊद इब्राहिमच्या मेव्हण्याची यूपीमध्ये गोळ्या घालून हत्या

दाऊद इब्राहिमच्या मेव्हण्याची यूपीमध्ये गोळ्या घालून हत्या

जलालाबाद : उत्तर प्रदेशातील जलालाबाद येथे आपल्या पुतण्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या निहाल खान या ३५ वर्षीय व्यक्तीची बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

निहाल खान हा दुसरा कोणी नसून फरार डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा मेहुणा होता. कौटुंबिक सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. निहाल हा जलालाबादचे चेअरमन शकील खान यांचा मेहुणा होता.

२०१६ मध्ये निहाल शकीलच्या भाचीसोबत पळून गेला होता. मात्र, नंतर दोघांमध्ये करार झाला. शकील म्हणाला, निहालची १५ फेब्रुवारीला फ्लाइट चुकली होती आणि रस्त्याने येथे आला होता. माझा भाऊ कामिल अजूनही २०१६ च्या त्या घटनेनंतर निहालवर रागावला होता आणि त्याला बदला घ्यायचा होता.

नुकतेच पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याला विषबाधा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब आणि गुगल सेवा बंद झाल्या आहेत. दाऊदला आधीच किडनीच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR