21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयनागपूर विमानतळावर तस्कराकडून ५० लाख किमतीचे सोने जप्त

नागपूर विमानतळावर तस्कराकडून ५० लाख किमतीचे सोने जप्त

नागपूर : सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. यात एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाने शारजाह वरुन येणा-या विमानातील प्रवाशाकडून तस्करीच्या उद्देशाने आणलेले सोने, आयफोन, आणि केसर जप्त केले आहे.

मोहमद मोगर अबास असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. अंतर्वस्त्रात त्याने हे सोने लपवले होते. गुप्त महितीच्या आधारे संशयित प्रवाशाची तपासणी केली असता, त्याच्याकडून ५ आयफोन, ७ स्मार्ट वाच, ८ किलो केसरसह एकूण ७७ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूर विमानतळ सोन्याच्या तस्करीसाठी आता हब होऊ लागले आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून नागपूर विमानतळावर सोने तस्करीच्या घटना सातत्याने उघड होत आहेत. १ जानेवारी २०२४ ला एका प्रवाशाकडून तब्बल दोन किलो सोने जप्त करण्यात आले होते. शारजहा ते नागपूर येणा-या एअर अरेबियाच्याच्या विमानात रामटेके नावाचा प्रवासी आपल्या सामानासह प्रवास करीत होता. त्याने कंबरेच्या पट्ट्यात सोन्याची छडी चपटी करुन आणली होती. दोन्ही विभागांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR