बंगळुरु : महिला प्रीमियर लीगचा पहिलाच सामना रंगतदार झाला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेलेला सामना मुंबई इंडियन्सने चार गडी राखून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात मुंबईकडून यास्तिका भाटिया ५७ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ५५ धावांची दमदार फटकेबाजी केली. तर मुंबईला एका चेंडून पाच धावांची गरज असताना संजनाने षटकार मारत दिल्लीच्या हातातला सामना मुंबईला जिंकून दिला.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्ध २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. दिल्लीकडून एलिस कॅप्सीने सर्वाधिक ७५ धावांची स्फोटक खेळी केली. यात आठ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. जेमिमाह रॉड्रिग्जने ४२ धावा केल्या. तर कर्णधार मेग लॅनिंगने मुंबईविरुद्ध ३१ धावा केल्या. दिल्ली कॅनिटल्सने ५ बाद १७२ धवांचे लक्ष मुंबईला दिले.
१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर संघाची पहिली विकेट पडली. हिली मॅथ्यूज शुन्यावरच तंबुत परतली. यानंतर यास्तिका भाटियाने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाईकरत ५७ धावांची आक्रमक खेळी खेळली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ५५ धावांची दमदार खेळी केली.यानंतर नताली सिव्हर ब्रंटने १९, अमेलिया केरने २४, पूजा वस्त्राकरने १ धावा केल्या. तर अमनजोत कौर तीन धावा करून नाबाद राहिल्या आणि संजनाने एका चेंडूत सहा धावा करून नाबाद राहिली. दिल्लीकडून अरुंधती रेड्डी आणि अलिस कॅप्सीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय मारिजन कप आणि शिखा पांडे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. हरमनप्रीत कौरला तिच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.