मुंबई : प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आपल्यात नसली तरी तिचे चाहते आजही तिची आठवण काढतात. श्रीदेवीचे २०१८ साली वयाच्या ५४ व्या वर्ष निधन झाले. आज तिची सहावी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने तिच्या दोन मुली श्रीदेवीचे फोटो शेअर करुन आपल्या आईच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
श्रीदेवीच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त, खुशी कपूरने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीवर एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या आणि जान्हवी कपूरच्या बालपणीचा आहे, ज्यामध्ये श्रीदेवी त्या दोघींच्या मध्ये उभी आहे. या .फोटोमध्ये श्रीदेवी सह खुशी आणि जान्हवी हसताना दिसत आहेत. ही फोटो पाहून श्रीदेवीचे चाहते आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांसह विविध क्षेत्रातून या फोटोवर भावूक पोस्ट करून आपल्या लाडक्या अभिनेत्रीची आठवण काढत आहेत.
श्रीदेवीने आपली कारकिर्दी बालकलाकार म्हणून साऊथ चित्रपटातून सुरू केली होती. यानंतर तिने सोलवा सावनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ज्यामध्ये ती जितेंद्रसोबत दिसली होती. आपल्या कारकिर्दीत श्रीदेवीने नगीना, चांदनी, लाडला , मिस्टर इंडिया, खुदा गवाह, हिम्मतवाला, सदमा, इंक्लाब, तोहफा, कर्मा, आखिरी रास्ता, चालबाज, लम्हे, गुमराह, जुदाई, मॉम आणि इंग्लिश विंग्लिश यासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.