नाशिक : नाशिकमध्ये शुक्रवारी सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात डॉक्टर राठी हे गंभीर जखमी झाले असून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर अज्ञाताने तिथून पळ काढला होता. आता या हल्ल्याचे कारण समोर आले आहे. तसेच आरोपीने डॉक्टरवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. या हल्ल्याचे कारण डॉक्टर आणि कर्मचारी महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहरात रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय देखील मागे घेण्यात आला आहे.
डॉक्टर कैलास राठी यांच्यावरील हल्ल्याचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. अज्ञात आरोपीने डॉक्टर राठी यांच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत डॉक्टर राठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्याचे कारण डॉक्टर आणि कर्मचारी महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समोर येत आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीने कोयत्याने डॉ. कैलास राठी यांच्यावर जवळपास १८ वार केले आहेत.