26.5 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeसोलापूरलोकमंगल समृद्धग्राम अभियान सुरू

लोकमंगल समृद्धग्राम अभियान सुरू

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये लोकमंगल समृद्धग्राम योजनेखाली अनेक प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. अनेक गावात विशेषतः तरुण वर्गाच्या पुढाकाराने अनेक लोकोपयोगी कामे करण्यात आली.

काही गावात गावकऱ्यांनी वृक्षारोपण करून तर काही गावातल्या तरुणांनी रक्तदान करून आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत समृद्धग्राम अभियानात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे काही गावांमध्ये लोकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आर ओ प्लांट बसवण्यात आले. आरोग्याच्या बाबतीत झालेली ही जागृती विशेष म्हणावी लागेल.

आमदार सुभाष देशमुख यांनी या सर्व गावातील गावकऱ्यांशी संवाद साधताना गावाचा विकास करण्यासाठी एक दिलाने आणि संघटितपणे काम करण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले.
सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये लोकमंगलतर्फे समृद्धग्राम अभियान राबविण्यात येणार असून गावातील लोकांच्या पुढाकाराने आणि परस्पर सहकार्याने त्या दृष्टीने विविध योजना तयार करण्यात येत आहेत.यावेळी काही गावांमधून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. काही गावात गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. उत्साहाने शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवमंडळांचा सन्मान करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांना त्या त्या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR