रांची : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने रांची कसोटीत ७३ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बशीर आणि टॉम हार्टली यांनी भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताची अवस्था ७ बाद १७७ धावा अशी केली.
दरम्यान, यशस्वी जैस्वालने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक मोठा विक्रम मोडला. यशस्वी जैस्वाल आता इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत दुस-या स्थानावर पोहचला आहे.
भारताकडून इंग्लंडविरूद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने ६५५ धावा केल्या होत्या. यानंतर ६०३ धावा करणा-या राहुल द्रविडचे नाव होते. मात्र आता त्याला मागे टाकून यशस्वी जैस्वालने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
इंग्लंडविरूद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज…
विराट कोहली – ६५५ धावा
यशस्वी जैस्वाल – ६०४ धावा
राहुल द्रविड – ६०२ धावा