24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यामला मारुनच दाखवा... मराठा बांधवांना न जुमानता जरांगे फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले

मला मारुनच दाखवा… मराठा बांधवांना न जुमानता जरांगे फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेट आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले. दरम्यान बोलत असताना जरांगे पाटील अचानक आक्रमक झाले, जमलेला मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शांत होत नव्हते. बैठक स्थळी अचानक एकच गोंधळ उडाला. मराठा समाजाच्या वतीने अनेकजण जरांगे शांत बसण्याचे आवाहन करत होते.

मनोज जरांगे उपोषण करत होते त्याठिकाणी बोलत असताना ते अचानक आक्रमक झाले, मी सागर बंगल्यावर येतो. मी आता येतो सागर बंगल्यावर तुम्हाला माझा बळी घ्या पण खोटे आरोप करू नका, असं म्हणत मनोज जरांगे उठून जाऊ लागले त्यावेळी जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘मी सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी असं म्हणत जरांगे पाटील म्हणाले. यानंतर ते स्टेजवरून उठून निघाले होते. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे स्टेजवर गोंधळ निर्माण झाला. जरांगे मी मुंबईला चालत जाणार असं म्हणत जागेवरून उठले. तेव्हा उपस्थित मराठा समाजाने त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. जरांगेंना श्वास घेताना त्रास होत होता. मात्र तरीही ते आक्रमकपणे बोलत असताना दिसले. तब्येत बिघडेल तुम्ही शांत व्हा अशी विनंती उपस्थित असलेले मराठा बांधव करत होते.

‘सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न’; मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारुन दाखवावं, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी कोणत्या पक्षाचा नाही मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR