18.6 C
Latur
Saturday, November 9, 2024
Homeमहाराष्ट्रमिहानमध्ये १ लाख युवकांना रोजगार मिळणार

मिहानमध्ये १ लाख युवकांना रोजगार मिळणार

नागपूर : कृषिआधारित व्यवस्था विकसित करण्यावर फोकस करणे आणि विदर्भातील शेतक-यांची प्रगती कशी होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

मिहान येथे ‘क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’च्या कार्यालयाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मिहानमध्ये लवकरच १ लाख तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विदर्भातील शेतक-यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने काम व्हावे. त्यासोबतच कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मिहान सेझचे विकास आयुक्त व्ही. श्रमन, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, क्लिक टू क्लाउड संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा, कुसुमलता मिश्रा उपस्थित होते. गडकरी यांनी क्लिक टू क्लाउड कंपनीद्वारे विकसित ‘ऍग्रिपायलट’ या प्रकल्पाचे सादरीकरण बघितले.

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे उत्पादन वाढविण्यास फायदेशीर ठरणारा हा प्रकल्प आहे. कंपनीद्वारे कॉम्पॅक्ट सॉइल डॉक्टरची निर्मिती करण्यात आली असून शेतक-यांना काही मिनिटांमध्ये मृदा परीक्षण करून मिळेल. गडकरी यांनी यासंदर्भात माहिती घेतली व प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. कंपनी २०० ते ३०० जणांना रोजगार देणार आहे. संचालन सन २०२२५ पासून नवीन इमारतीत सुरू होईल. कंपनीने २०२९ मध्ये १.२ एकर जमीन घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR