नवी दिल्ली : भारताने काही वर्षांपूर्वी रशियाकडून इंडियन एअर फोर्ससाठी आर-७३ आणि आर-२७ प्रक्षेपणास्त्र विकत घेतले होते. भारताने रशियाकडून विकत घेतलेली हीच आर-७३ आणि आर-२७ प्रक्षेपणास्त्र जुनी होऊ लागली. त्यांची मुदत संपली. आता यांचा काही उपयोग नाही, असे दिसू लागले, त्यावेळी भारतीय वैज्ञानिकांनी या मिसाइलमध्ये सुधारणा केल्या. आता भारताने जमिनीवरुन हवेत मारा करणा-या क्षेपणास्त्रांमध्ये ही मिसाइल बदलली आहेत.
हवेतून हवेत हल्ला करण्याची या क्षेपणास्त्रांंची क्षमता होती. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताच्या आकाशात भारतीय आणि पाकिस्तानी फायटर विमानांमध्ये डॉग फाइट झाली. त्यावेळी भारताने आर-७३ मिसाइलनेच पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते.
या सिस्टिमला समर एअर डिफेंस सिस्टम असे नाव दिले. अलीकडे राजस्थान पोखरणमध्ये वायुशक्ति २०२४ युद्धाभ्यास झाला. त्यावेळी जमिनीवरुन हवेत मारा करणा-या या प्रक्षेपणास्त्राने आपली अचूक मारक क्षमता दाखवली. समर मिसाइल ट्रकमधून लॉन्च केले जातात. समर मिसाइल 2982 कि.मी./प्रति तास या वेगाने कुठल्याही हवाई टार्गेटला हिट करु शकतात. समर सिस्टिमचे पूर्ण नाव सरफेस-टू-एयर मिसाइल फॉर एस्योर्ड रीटॅलिएशन असे आहे.
या मिसाइल सिस्टिमचे संचालन वायुसेनेचे बीआरडी यूनिट करते. समर सिस्टिम कुठल्याही हवाई टार्गेटला हिट करु शकते. हेलिकॉप्टर आणि फायटर जेट्सवर अचूकतेने प्रहार करता येतो. याच्या लॉन्चरवरुन दोन मिसाइल डागण्याची व्यवस्था आहे. समर मिसाइलची रेंज १२ ते ४० किलोमीटर आहे.