24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबिटकॉईन किंमत ऐतिहासिक पातळीवर!

बिटकॉईन किंमत ऐतिहासिक पातळीवर!

बिटकॉईनची मागणी पुन्हा वाढतेय! दर पोहचला ५६ हजार डॉलर्सवर

लंडन : क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी असून बिटकॉईनच्या किमतीने मोठी झेप घेतली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत 24 फेब्रुवारी रोजी ५६ हजार डॉलर्सवर पोहोचली आहे. तब्बल २६ महिन्यांनंतर म्हणजेच दोन वर्षे आणि दोन महिन्यांनंतर या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये किमतीने इतका मोठा स्तर गाठला होता. त्या आधी नोव्हेंबर २०२१ मध्ये, बिटकॉइनने ६९,००० डॉलर्स असा सर्वकालीन उच्च दर गाठला होता. त्यानतर त्यामध्ये मोठी घसरण सुरू झाली.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बिटकॉइनमध्ये या वाढीचे कारण म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्सद्वारे शाश्वत गुंतवणूकदारांच्या मागणीत सतत होणारी वाढ. मजबूत ईटीएफ प्रवाहामुळे गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीकडे कल वाढला आहे.बिटकॉइन सध्या ९.२६ टक्क्यांच्या वाढीसह प्रति टोकन ५६,०६२.०२ डॉलर्स इतकी आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंडांद्वारे बिटकॉइनच्या किमतीमध्ये वाढ झाली. गेल्या महिन्यात, गुंतवणूकदारांनी एळऋ मध्ये क्रिप्टोकरन्सी ईटीएफमध्ये ५ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली.

बिटकॉइन ईटीएफला अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने मान्यता दिली आहे. यानंतर नवीन गुंतवणूकदारांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित होते आणि तेच होत आहे. त्याचे मूल्य आणखी वाढण्याचे एक प्रमुख कारण एक्सचेंज ट्रेडेड फंडांच्या रूपात समोर आले आहे. २२ जानेवारी रोजी ३५,००० डॉलर्सच्या खाली असलेली पातळी दिसून आली होती. त्यात आता मोठी वाढ झाली आहे. २२ जानेवारी हा बिटकॉइनच्या घसरणीचा एक मोठा दिवस होता. सात आठवड्यांतील सर्वांत कमी पातळीवर गेला होता.

जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी
लोक सहसा बिटकॉइनच्या दराबद्दल उत्सुक असतात कारण ही उच्च जोखीम-उच्च परताव्याची मालमत्ता आहे. २०१० आणि २०२० या वर्षांमध्ये, त्याने ९०,००,००० टक्के परतावा दिला आहे जो असाधारण आहे.

काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर, रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीने केला जातो तशाच पध्दतीने पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात २००९ साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येत आहे. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR