लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्स संघटनेच्या स्टडी सर्कलचे (कायदेविषयक माहिती) उद्घाटन गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता येथील दयानंद सभागृहात होणार असून यानिमित्त नाशिकचे सायबर लॉ तज्ज्ञ प्रा. विकास नाईक यांचे ‘सायबर सेक्युरीटी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्स संघटनेच्या अध्यक्षा अॅड. जयश्रीताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
हा कार्यक्रम महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्स, दयानंद विधी महाविद्यालय आणि लातूर जिल्हा वकील मंडळाच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्याचे सांगून अॅड. जयश्रीताई पाटील पुढे म्हणाल्या की, स्टडी सर्कलचा हा उद्घाटन सोहळा लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. अण्णाराव पाटील हे राहणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिंिलद पाटील, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ
वुमेन लॉयर्सच्या उपाध्यक्षा अॅड. जयश्री अकोलकर, फेडरेशनच्या माजी अध्यक्षा अॅड. निलिमा वर्तक, अॅड. बळवंत जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या पत्रकार परिषदेस लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. महेश बामणकर, अॅड. किरण चिंते, अॅड. सुरेखा जाकते, अॅड. अरुणा वाघमारे, अॅड. पूनम सुरकुटे, अॅड. पल्लवी कुलकर्णी, अॅड. सुनंदा इंगळे, अॅड. बबिता संकाये, अॅड. तृप्ती इटकरी आदींची उपस्थिती होती.