25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमातंग समाजाने मानले दिलीपराव देशमुख यांचे आभार

मातंग समाजाने मानले दिलीपराव देशमुख यांचे आभार

लातूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टी व  मातंग समाजाच्या विविध विकासाच्या मागण्या मान्य होण्यासाठी माजी मंत्री आमदार आमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत जोरदार मागणी केली होती तसेच अंगद वाघमारे यांच्या लक्षवेधी उपोषणाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भेट देऊन डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीची स्थापना सरकारने त्वरित करा, अशी मागणी केली होती. त्याला यश आले असून राज्य सरकारने स्वतंत्र आर्टी डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने मातंग समाजाने गुरुवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
अनुसूचित जातीतील १३ टक्के आरक्षणात अ, ब, क आणि ड वर्गीकरण करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर स्वतंत्र आर्टी डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ करावी आदी मागण्यांसाठी लहूजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे यांनी दि. २१ ते २२ जुलै २०२३ दरम्यान लाक्षणिक उपोषण केले होते.
या उपोषणास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भेट देऊन मातंग समाजाच्या मागण्यांना पाठींबा दिला होता. परंतू, शासनाने या मागण्यांचा विचार केला नाही. त्यामुळे या मागण्यांकडे शासनाचे लक्षवेधण्यासाठी अंगद वाघमारे यांनी पुन्हा दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. दरम्यान नागपूर येथे शासनाच्या हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मातंग समाजाच्या मागण्या मांडुन त्या मंजूर करण्याचा अग्रह केला होता. त्यामुळे राज्य शासनाने दि. २७ फेबु्रवारी रोजी स्वतंत्र आर्टी डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास मंजूरी दिली.
या अनुषंगाने लहूजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे व मातंग समाजातील नागरिकांनी गुरुवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. प्रा. डॉ. माधव गादेकर, डॉ. शिवाजी जवळगेकर, गोरोबा लोखंडे, प्रा. विश्वंभर सुर्यवंशी, विकास कांबळे, आनंद वैरागे, राहुल क्षीसागर, दलितमित्र सुरेश चव्हाण, प्रविण कांबळे, अ‍ॅड. अंगद गायकवाड, प्रा. नागनाथ डोंगरे, सुनिल बसपुरे, सुशीलकुमार कांबळे, अ‍ॅड. महेश नायकवाडे, अप्पासाहेब देडे, संपतं गायकवाड, दत्ता गायकवाड, नारायण कांबळे हिपळगावकर, दिनकर मस्के, मेजर विजय शिंदे,  आनंद दनके यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR