27.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रयवतमाळमधील पीएम मोदींच्या सभेचा खर्च सुमारे १३ कोटी

यवतमाळमधील पीएम मोदींच्या सभेचा खर्च सुमारे १३ कोटी

यवतमाळ : पीएम मोदी यांची बुधवारी यवतमाळमध्ये सभा पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग या निवडणुकीतून फुंकले गेले. या सभेसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून जबरदस्त तयार करण्यात आली होती. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार यवतमाळच्या सभेसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा आकडा पाहून सुद्धा भूवया उंचावल्या गेल्या आहेत. सभेचा खर्च तब्बल १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपये एवढा आला आहे.

पीएम मोदींच्या सभेसाठी भव्य मंडप तसेच इतर व्यवस्था करण्यासाठी करण्यात आलेला खर्च तब्बल १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपयांच्या घरात आहे. एका सभेचा हा इतका अवाढव्य खर्च असेल, तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती पैशांचा चुराडा केला जाईल, याचा विचार न केलेला बरा असे म्हणायची वेळ आली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारकडून शासन आपल्या जारी हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे. यासाठी सुद्धा कोट्यवधींच्या घरात खर्च आहे. विरोधकांकडून सरकारकडून करण्यात येणा-या जाहिरातींवरील खर्चावही सातत्याने टीका होत आहे.

मोदींकडून अब की बार ४०० पारचा नारा
मोदी यांनी यवतमाळमध्ये झालेल्या सभेत अब की बार ४०० पारचा नारा देत नागामी लोकसभा निवडणुकीसाठी बिगुल फुंकला. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामाचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे निधी वितरण पार पडले. नागपूर रोडवरील डोर्लीमध्ये मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी रेल्वेसह विविध योजनांचा श्री गणेशा करण्यात आला. नमो शेतकरी महासन्मान योजना दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता वितरित करण्यात आला. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री महाराष्ट्राचे असूनही केंद्रातून निघालेल्या एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यांनी पोहोचेले. म्हणजे मी आता जे २१ हजार कोटी लाभार्थ्यांचे खात्यामध्ये पोहोचवली त्यातले १८००० कोटी लुटले गेले असते अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी, मोदी यांचे व्यासपीठावर सहा वाजून दोन मिनिटांनी आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाची पगडी तसेच स्वयंसहाय्यता गटांनी बनवलेल्या वस्तू भेट देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर विकासकामांचे लोकार्पण झाल्यानंतर या मोदींनी २४ मिनिटांचा भाषणामध्ये विविध मुद्यांना स्पर्श केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR