31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरडॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा मिळावी म्हणूनच स्टॅच्यू ऑफ नॉलेजची उभारणी

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा मिळावी म्हणूनच स्टॅच्यू ऑफ नॉलेजची उभारणी

लातूर : प्रतिनिधी
चार वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर डॉ. बाबासाहेबांचा  ७२ फुट उंचीच्या पुतळ्याची प्रतीकृती माझा मुलगा शंकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली होती. त्यासाठी महीनाभराची मुदत होती. मात्र जनतेतून याच ठिकाणी त्याच उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी पुढे आली. आज या ठिकाणी ७५ फुट उंच पुतळ्याची उभारणी होत असून  डॉ. बाबासाहेबांचा हा पुतळा त्यांच्या विचारांची सातत्याने प्रेरणा देत राहील, असा विश्वास खासदार सुधाकर शृंगारे यांनी आयोजीत स्टॅच्यू ऑफ नॉलेज भुमीपूजन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर शुक्रवारी हाजारो नागरिकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुट पुतळा अर्थात  स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या नियोजित जागेचा भुमिपूजन सोहळा पु. भिक्खू धम्मसेवकजी महाथेरो (मुळावा) यांच्या शुभ हस्ते पार पडला. या प्रसंगी खासदार सुधाकर शृंगारे, भाजपाचे शहराध्यक्ष देविदास काळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, चंद्रकांत चिकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शृंगारे यांनी लातूर जिल्ह्याला ज्येष्ट नेते शिवराज पाटील चाकूरकर, स्व. विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते लाभले. त्याच्याकडून व इतर नेत्यांची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात अनेक विकास कामे केली. स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारणीसाठी अनेक आडथळे आली
 त्यावर मात करत सातत्याने पाठपुरावा केला राज्यात इंदू मील जागेवर व त्यानंतर लातूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुट उंच पुतळा उभारत आहे. हा पुतळा लातूरच्या वैभवात भर टाकण्या बरोबरच तो भावी पिढीला विचाराची कायम प्रेरणा देत राहील, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी दिलीप देशमुख, देविदास काळे व चंद्रकांत चिकटे यांनी ही आपले मनोगत केले. या कार्यक्रमानिमित्त मंजुषा शिंदे, सिमाताई पाटील, जॉली मोरे यांच्या भिम गितांचा कार्यक्रम पार पडला.म्हणूनच स्टॅच्यू ऑफ नॉलेजची उभारणी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR