30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूर२५ लाख २ हजार बालकांचे होणार लसीकरण

२५ लाख २ हजार बालकांचे होणार लसीकरण

लातूर : प्रतिनिधी
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी संपूर्ण देशात राबविण्यात येते. या मोहिमेंतर्गत उद्या दि. ३ मार्च रोजी जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २५ लाख २ हजार २५८ बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. ग्रामीण, शहरी व मनपा कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
पल्स पोलिओ मोहीम झाल्यावर एक दिवसाचा खंड देवून लगेच आयपीपीआय मोहीम ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नियोजित कृतीनियोजनानुसार कर्मचा-यांमार्फत घरोघरी भेटी देवून पोलिओ मोहिमेच्या दिवशी वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात येणार आहे.
स्थलांतरित होणा-या लोकसंख्येतील काही बालके पोलिओ लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही मोहीम यशस्वीरित्या राबवून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी मजूर वसाहतीत, वीट भट्टी, साखर कारखाने, ऊस तोडणी कामगार वसाहती, फिरस्ते कुटुंब  ज्या भागात वास्तव्यास आहेत, अशा ठिकाणांचा शोध घेवून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी मोहिमेच्या एक दिवस अगोदर
मोबाईल टीमद्वारे लसीकरण केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेने आपल्या ० ते ५ वर्षाच्या बालकांना पोलिओ लस पाजून मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
लातूर शहराच्या विविध ठिकाणी, शहराच्या बाहेरील भागातील तुरळक वसाहत, बसस्थानक, बसचे थांबे इत्यादी  ठिकाणी बुथची व मोबाईल टिमची सोय करण्यात आली आहे.  लातूर शहरात ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांची संख्या अंदाजीत ४५ हजार एवढी आहे.
यासाठी शहरामध्ये एकूण २१५  पोलिओ लसीकरण केंदाच्या ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. १९८ बुथ १७ ट्रांझीट टिम (एकुण २१५) व्­यतिरिक्­त एकुण ३ मोबाईल टिमची व्­यवस्­था करण्­यात आली आहे.  ट्रांझीट टिमद्वारे शहरातील बस स्­थानक व प्रत्­येक बस थांब्­याच्­या ठिकाणी पल्­स पोलिओ लसीकरणाची सोय करण्­यात येत आहे. तसेच मोबाईल टिमद्वारे शहरातील प्रसुती रुग्­णालयामधील नवजात बालकांना सर्व रुग्­णालयात जावून पोलिओ लस देण्­यात येणार आहे. तसेच शहराच्­या ंिरगरोडच्या भोवतालच्­या परिसरातील लाभार्थींना पोलिओ लस देण्­यासाठी स्­वतंत्र मोबाईल टिमची व्­यवस्­था करण्­यात आली आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी लातूर महानगरपालिका कार्यालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय येथील अंगणवाडी कर्मर्चा­यांची,तसेच विवीध खाजगी शाळांच्­या शिक्षकांची बुथप्रमुख म्­हणून नियुक्­ती करण्­यात आली आहे. तसेच शासकीय नर्सिंग स्­कूल, बाभळगाव, महालींग स्वामी नर्सींग स्कूल, न्यु व्हीजन नर्सींग स्कूल, इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल, महाराष्­ट्र नर्सिंग स्­कुल, वेदांत नर्सिंग स्कूल, स्­वामी विवेकानंद नर्सिंग स्­कुल, एम. आय. टी. नर्सिंग विद्यालय  इत्यादी नर्सिंग कॉलेजच्या ए एन एम, जी.एन.एम. स्टूडंटचा सहभाग घेण्यात येत आहे. तसेच विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणुन सहभाग घेण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR