नागपूर : ‘सीएसआर’ फंडाच्या नावाने अधिक पैशांचे आमिष दाखवून मुंबईतील काही व्यक्तींनी मिळून नागपुरातील एका व्यापा-याची १ कोटीची फसवणूक केली. ही घटना नागपूरच्या जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
यात तथाकथित टाटा कंपनी एका एनजीओला ४६० कोटी रुपये देणार असून, त्यातील ४०० कोटी कॅशमध्ये परत घेणार आहे. त्यातील उर्वरित ६० कोटी रुपयांपैकी अर्धे पैसे देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
धक्कादायक बाब म्हणजे राजकारण्यांच्या पैशांचे व्यवहार सांभाळण्याचा दावा करणा-या एका संशयित आरोपीने थेट गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचादेखील वापर केला. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणा-या आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.