27.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeराष्ट्रीयस्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक अत्याचार करून बेदम मारहाण

स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक अत्याचार करून बेदम मारहाण

दुमका : झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुमहाट येथील एका स्पॅनिश परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ज्यांची चौकशी केली जात आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिस तपास करत आहेत.

स्पेनमधून आलेले एक महिला आणि एक पुरुष पर्यटक दोन वेगवेगळ्या बाइकवरून जात होते. संध्याकाळची वेळ असल्याने दोघेही हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा १० वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ तरुण तेथे आले आणि त्यांनी प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR